आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी; एका तरुणास कारावास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - तालुक्यातील खेरडा येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पृथ्वीराज ऊर्फ बाळू किसन कांबळे (२८) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत बासंबा पोलिसात पीडित १४ वर्षीय मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ फेब्रुवारी २००७ रोजी लग्नाचे आमिष दाखवून घरातून पळवून नेण्यात आले. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २००७ दरम्यान आरोपीने मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. पी. दिवटे यांनी आरोपीला दोषी ठरवत ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर टेकनूर यांनी काम पाहिले.