आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढणाऱ्या प्राचार्याला विद्यार्थीनींनीच शिकवला धडा, घेराव घालून बदडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देत एका विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या प्राचार्याला विद्यार्थीनींनी चांगलाच धडा शिकवला. महाविद्यालयाचे प्राचार्य राणा डोईफोडे यांना विद्यार्थीनींनी घेराव घालत चांगलाच चोप दिला. बीड येथील विठाई हॉस्पीटल मधील परिचारिका महाविद्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला.
 
बीड शहरातुन जाणाऱ्या धुळे -सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील जिरेवाडी शिवारात विठाई हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलजवळील परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य राणा डोईफोडे यांनी गुरूवारी  नर्सिंगच्या तृतीय  वर्षातील एका विद्यार्थीनीस प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देवुन तिची छेड काढली होती. विद्यार्थींनी हा प्रकार तिच्या कुटूंबीयांना सांगितल्यानंतर शुक्रवारी मुलीच्या भावाने त्याच्या मित्रासह महाविद्यालयात जावुन प्राचार्य डोईफोडे यांना जाब विचारला. तेंव्हा इतर मुलींनीही प्राचार्याकडून छेडाछेड होत असल्याचे सांगीतले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनीनी प्राचार्य डोईफोडेंना घेराव घालत धक्काबुक्की केली.
 
ही माहिती मिळाल्यांनतर बीड ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी महााविद्यालयात धाव घेतली. प्राचार्याची जमावाच्या तावडीतुन सुटका करत त्यांना बीड ग्रामीण ठाण्यात आणले. या प्रकरणी एका विद्यार्थीनीच्या तक्रारीवरून प्राचार्य डोईफोडे विरूध्द ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यानांही अटक करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील पाली जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या सदस्या सारिका डोईफोडे यांचे राणा हे पती आहेत.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा घटनेचा व्हिडिओ आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...