आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडाच्या भीतीने पळणार्‍या विद्यार्थिनीस ट्रकची धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड / गेवराई - भुकेने व्याकूळ 15 माकडे थेट गेवराईच्या आठवडी बाजारात घुसल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांच्या अंगावर गेली. विक्रेत्यांजवळील कांदे, बटाटे हिसकावून घेत त्यांनी धुमाकूळ घातला. यातील तीन माकडे जवळ येत असल्याच्या भीतीने पळत सुटलेली विद्यार्थिनी राष्ट्रीय महामार्गावर ट्रकखाली सापडली. या दुर्घटनेत तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.
नीता प्रभाकर पवार (8) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. गेवराई शहरातील शासकीय गोदामाकडून भुकने व्याकूळ झालेल्या 15 माकडांचा कळप सकाळी अकरा वाजता माऊली शूजच्या छतावर गेला. तेथे माकडांनी धुमाकूळ सुरू केला. संजयनगर भागातील दुसरीतील विद्यार्थिनी नीता शिवाजी चौकातील जि.प. कन्या शाळेकडे निघाली. तेव्हा तीन माकडे तिच्या दिशेने आली. घाबरलेली नीता महामार्गावरून पळतानाच बीडहून पैठणकडे निघालेल्या ट्रकने (एमएच 12 एक्यू 4118) तिला धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याने गेवराईच्या डॉक्टरांनी तिला औरंगाबादला हलवण्याचा सल्ला दिला.