लातूर - पप्पा, कुणीही हुंडा का मागतो? मुलीच्या बापानेच का झुकायचे? हुंड्याची प्रथा मोडली पाहिजे. दिवसाचे गोडजेवण, मासिक, वर्षश्राद्ध हे विधी मेलेल्याला शांती लाभावी म्हणून करतात, परंतु तुम्ही हे विधी करू नका, यातच मला शांती आहे. तुम्ही रडू नका, मला चांगलं वाटेल. पप्पा स्वत:ची काळजी घ्या, अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील मोहिनी पांडुरंग भिसे या १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. येणारे प्रत्येक स्थळ हुंड्याची विचारणा करतेय आणि जन्मदात्याकडे तर दुष्काळ व नापिकीमुळे हुंडा द्यायला पैसे नाहीत. यातून वडिलांची सुटका करण्यासाठी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
मोहिनीला एक भाऊ व एक विवाहित बहीण आहे. वडील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना एक एकर शेती आहे. गावातीलच शाळेत मोहिनीचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते. तिच्यासाठी स्थळ पाहणे सुरू होते. नापिकीमुळे शेतातून उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी परवड सुरू झाली. असे असतानाही मोहिनीसाठी स्थळ पाहणे सुरू होते. तथापि येणारा प्रत्येकजण हुंड्याची विचारणा करत होता. आपल्या वडिलांची यामुळे होणारी घालमेल मोहिनीला पाहवत नव्हती. त्यामुळे तिने बुधवारी घरात कोणी नसल्याचे पाहून ओढणीने गळफास घेतला. मृतदेहाजवळ मोहिनीचे पत्र मिळाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, मोहिनीची सुसाइड नोट....