आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या मुलीला सहलीला जाता आले नाही, नववीच्या विद्यार्थीनीने उचलले हे पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीर्थपुरी (जालना) - शाळेच्या सहलीला जाण्यासाठी आईवडिलांनी पैसे न दिल्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. घनसावंगी तालुक्यातील मुरमा या गावात रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

शीतल श्यामसुंदर मुकणे (१५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव अाहे. ती तीर्थपुरी येथील मत्स्योदरी महाविद्यालयात शिकते. या महिन्याच्या अखेरीस शाळेची सहल जाणार आहे. त्यासाठी ज्यांना सहलीला जायचे आहे त्यांनी आगाऊ पैसे भरण्याचे शाळेच्या वतीने कळवण्यात आले होते. त्यासाठी शीतलने आई -वडिलांकडे पैशांची मागणी केली. शीतलचा भाऊदेखील याच शाळेत इयत्ता आठवीत शिकतो. एकाच वेळी दोघांचे पैसे भरणे शक्य नसल्याने शीतलला दुसऱ्या वेळेस सहलीला पाठवू असे समजावण्यात आले. मात्र तरी ती नाराज होती. त्यामुळे ती घराचा दरवाजा बंद करुन आत बसली तर तिची आई बाहेर स्वयंपाक करीत होती. याचवेळी तिची शेजारची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली तेव्हा तिने दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा खिडकीतून डोकावून पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तिला अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. शितलचे वडील शामसुंदर मुकणे यांच्याकडे चार एकर शेती आहे. शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीत पाणी सोडण्याचे काम सुरु केले होते. प्रतिकूल परिस्थितीतही मुले शिकावीत यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता असे श्यामसुंदर मुकणे यांनी सांगितले. 
 
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)