आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या मुलीने लग्न होत नसल्याने जाळून घेतले, लासीना येथील दुर्दैवी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- तालुक्यातीललासीना येथे सतरा वर्षीय मुलीने सतत होत असलेल्या नापिकीमुळे वडिलांकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसल्याने लग्नाच्या काळजीने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ज्योती पंढरीनाथ कुबडे असे मुलीचे नाव असून तिला नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तिचे वडील नापिकीमुळे कर्जबाजारी झाले आहेत. पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी केवळ हुंड्याच्या कारणावरून सोयरिक नाकारली. त्यामुळे गतवर्षीपासूनच ज्योती मानसिक तणावात होती. बुधवारी दुपारी च्या सुमारास तिने अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले. या प्रयत्नात ती ९० टक्के भाजली असून येथील सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी तिला नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.