आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्पदंशाने मुलीचा मृत्यू; भाऊ, वडील बचावले, मुलगा सार्थक वाळुंजेवर घाटीत उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर - कन्नड तालुक्यातील आठेगाव येथील शेतवस्तीवरील एकाच कुटुंबातील तिघांना गुरुवार रोजी पहाटे सापाने दंश केल्याची घटना घडली. या घटनेत मुलगी गायत्री दिलीप वाळुंजे (वय ७) हिचा मृत्यू झाला, तर वडील दिलीप वाळुंजे (वय ३०) यांची प्रकृती चांगली असून मुलगा सार्थक वाळुंजे (वय ४) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहे.

हतनूर ते आठेगाव रस्त्यावरील शिवारात दिलीप जयवंतराव वाळुंजे यांची शेतवस्ती आहे. हे आपल्या कुटुंबासह शेतवस्तीवर राहतात गुरुवार (दि . १५) रोजी पहाटे यांची मुलगी गायत्री हिला काहीतरी अंथरुणात चावल्याचा भास झाला. थोड्या वेळाने जवळच असलेला भाऊ सार्थक यालाही काहीतरी चावल्याने सार्थक रडायला लागला यांचे वडील दिलीप वाळुंजे यांनी पाहिले असता यांनाही अस्वस्थ वाटू लागले.

अस्वस्थ झाल्याने सापाने दंश केला असल्याचे गृहीत धरून आसपास शोधले असता साप आढळून आला. लगेच तिघांनाही हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले. येथे जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाइकांनी येथून पुढील उपचारासाठी घाटीत नेले.
बातम्या आणखी आहेत...