आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शौचालयासाठी मोर्चा; २१ पालकांनी केले मुलींच्या हस्ते भूमिपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामपंचायतीसमोर मुलींनी असे आंदोलन केले. - Divya Marathi
ग्रामपंचायतीसमोर मुलींनी असे आंदोलन केले.
शिरूरकासार (बीड) - घरात शौचालय नसल्याने होणारी कुचंबणा आणि अारोग्याचा प्रश्न यावर गावातल्या मुली एकत्र आल्या, चर्चा केली आणि गावच्या पाणंदमुक्तीसाठी या मुलींनी थेट ग्रामपंचायतीवरच मोर्चा काढला. यावर जागृत झालेल्या २१ पालकांनी तत्काळ मोर्चेकरी मुलींच्याच हस्ते शौचालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. शिरूरकासार तालुक्यातील गोमळवाडा येथील हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. गोमळवाडा येथे खूप कमी घरांत शौचालय आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उभारलेले नाही. शौचासाठी उघड्यावर जावे लागत असल्याने महिला, मुलींसह गावकऱ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर गावातल्याच मुलींनी उपाय शोधला. गावातल्या जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील मुलींनी चर्चा करुन गाव पाणंदमुक्त करण्यासाठी थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आणि थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. गाव पाणंदमुक्तीच्या घोषणाही दिल्या.
गवळींकडून बोअर : गावातील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनीही शाळेतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वखर्चातून शाळेच्या प्रांगणात बोअर घेऊन देण्याचे या वेळी जाहीर केले.
२१ कुटुंबांनी केले भूमिपूजन : दरम्यान, शौचालय बांधण्यासाठी मोर्चा काढावा लागतो ही शरमेची बाब वाटल्याने आणि आपल्याच मुलींनी काढलेला हा मोर्चाने जागृती निर्माण होऊन २१ जणांनी तत्काळ शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला.
आणि मोर्चेकरी मुलींच्याच हस्ते नारळ फोडून भूमीपुजनही केले.
जाणीव व्हावी म्हणून
^घरात शौचालय बांधणे ही गरज आहेच. आरोग्याचाही प्रश्न आहे. प्रत्येकाला याची जाणीव व्हावी म्हणून गावातील सर्व शाळकरी मुलींनी एकत्र येत हा मोर्चा काढला.
- वैशाली राम काकडे, विद्यार्थिनी
बातम्या आणखी आहेत...