आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करमाडच्या सरपंचपदी गीता कोरडे यांची वर्णी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - औरंगाबाद तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका शुक्रवारी शांततेत पार पडल्या. महत्त्वाच्या अशा पिंप्रीराजा व करमाड भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. काँग्रेसने कुंभेफळ ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.
३८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या. करमाडमध्ये सरपंचपदी भाजपच्या गीता कोरडे या बिनविरोध तर उपसरपंचपदासाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय उकर्डे व तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष कैलास उकर्डे या दोघांचे नामनिर्दशन पत्र दाखल झाले होते. त्यामुळे उपसरपंचपदासाठी हात उंच करून मतदान झाले. दत्तात्रय उकर्डे यांनी काँग्रेसचे कैलास उकर्डे यांचा ९ विरुद्ध ४ मताने पराभव केला. पिंप्रीराजा ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. सरपंचपदी भाजपच्या ताराबाई प्रकाश चांगुलपाये तर उपसरपंचपदी अस्लम शेख रज्जाक तर कुंभेफळ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी काँग्रेसच्या कांताबाई मुळे या पुन्हा संधी मिळाली. त्यांनी भाजपचे श्रीराम शेळके यांचा ६ विरुद्ध ४ मताने पराभव केला.