आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give 35 Seats Of Assembly, Ramdas Athwale Demanding Mahayuti

विधानसभेच्या 35 जागा द्या, रामदास आठवले यांची महायुतीकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - काँग्रेस-राष्ट्रवादीने दलित मताचा उपयोग करून घेतला. मात्र, एका मंत्रिपदापलीकडे काहीही दिले नाही. त्यामुळे आता महायुतीकडे सत्तेमध्ये 20 टक्के वाटा मागितला असून लोकसभेच्या 3 जागा, राज्यसभेची एक आणि विधानसभेच्या 35 जागा मागितल्या असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. स्वत: मात्र, राज्यसभेत जाणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
पक्षाच्या परिवर्तन मेळाव्यासाठी आठवले बुधवारी उस्मानाबादेत आले होते. तत्पूर्वी त्यांनी विर्शामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशामध्ये सत्तेचे, समाजाचे आणि आर्थिक परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी महायुतीच्या माध्यमातून मोठी ताकद निर्माण करण्यात येत आहे. राहूल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी काँग्रेसने पुढे आणले, तरी त्यांना जनता स्वीकारणार नाही. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येईल. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचे संविधान बदलण्याची शंका आहे. त्यामुळे भाजपाने यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या प्रवेशाने महायुतीची ताकद अधिक वाढली आहे. माझ्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, जानकर अशी 5 जणांची समिती गठित करण्यात आली असून ही समिती लोकसभेच्या जागा वाटपांसाठीचे धोरण ठरवेल. महिनाअखेरपर्यंत जागा वाटप करण्यात येतील. त्यानंतर पुढच्या महिन्यात विधानसभेच्या जागा वाटप होतील, असे ते म्हणाले.
ओबामांची भेट घेणार : देवयानी खोब्रागडे प्रकरणात अमेरिकेकडून मिळालेल्या वागणुकीच्या निषेधार्थ रिपाइंने अधिक आक्रमक भूमिका घेतली होती. संपूर्ण देश देवयानीच्या पाठीशी उभा राहीला होता. मात्र, यामागे उच्च्वर्णीय लोकांचा हात आहे काय, हे तपासण्यासाठी मी स्वत: अमेरिकेला जाणार आहे. बराक ओबामा यांची भेट घेणार असल्याचे सांगून उत्तम खोब्रागडे यांनी मीडियावर जातीयवादाचे केलेले आरोप चुकीचे असल्याचे आठवले म्हणाले.