आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांना प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन द्या : डॉ. शरद रामढवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - दिव्यांगांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावी, असे आवाहन डॉ. शरद रामढवे यांनी शनिवारी येथे केले.
जिल्हा समाजकल्याण कार्यालय व रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित दिव्यांगावर प्रतिबंधात्मक उपाय, या विषयावरील चर्चासत्रात डॉ. रामढवे यांनी मार्गदर्शन केले. कर्णबधिर मुलांच्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती गिरिजाबाई पुंजारे होत्या.
देवलिंगअप्पा देवडे, विजयराव कान्हेकर, रां. द. बोंडे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या फेरीत अपंग, मूकबधिर मुलांनी डॉक्टर, वकील, पोलिस अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या वेशभूषा करत लक्ष वेधून घेतले. त्यांच्यात परस्पर संवाद घडवून आणण्यात आला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी एल. जी. कदम यांनी प्रास्ताविकात दिव्यांगांच्या योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन माधव घयाळ यांनी केले, तर जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.
जिल्हा समाजकल्याण कार्यालय व रेणुका शिक्षण प्रसारक मंडळातर्फे काढण्यात आलेल्या दिव्यांगांच्या फेरीत मूकबधिरांनी डॉक्टर, पोलिस आदींच्या वेशभूषेत परस्परांशी संवाद साधला.
बातम्या आणखी आहेत...