बीड - सरसकट, तत्त्वत: आणि निकष या सगळ्या शब्दांच्या खेळात शासनाने शेतकऱ्यांना अडकवून फसवी कर्जमाफी देऊ नये. वाहनधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात येत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आणि पिकअपसारखी शेतीला आवश्यक असणारी वाहने आहेत त्या शेतकऱ्यांना यातून वगळू नये, अशी मागणी करतानाच शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले तर शेतकरीही त्यांना वाऱ्यावर सोडतील, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिला.
शुक्रवारी रात्रीच बीड मुक्कामी आलेल्या पवार यांनी शनिवारी सकाळी सुरुवातीला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानंतर आशीर्वाद लॉन्समध्ये कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संग्राम कोते, जीवनराव गोरे, चित्रा वाघ, आमदार अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती.
पवार यांनी स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले. सध्या पक्षबांधणीकडे लक्ष असून यासाठीच विविध जिल्ह्यांचे दौरे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहन आहे त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात येणार आहे, परंतु अनेक शेतकरी जुने ट्रॅक्टर शेतीकामासाठी खरेदी करतात. शेतमालाच्या वाहतुकीसाठी मुलाला पिकअपसारखे छोटे वाहन खरेदी करून देतात. त्यांना यातून वगळण्यात येऊ नये, असे पवार म्हणाले.
पुढील स्लाइडमध्ये, कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकऱ्याने का केली अशी पेरणी
हेही वाचा,