आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Reservation, If Not Then Teach Lesson; Sambhajiraje Give Warning

आरक्षण द्या, अन्यथा धडा शिकवणार;संभाजीराजे यांचा सरकारला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता वाढीव आरक्षण देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला जावा, अन्यथा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला गृहीत धरू नका, असा इशारा युवराज संभाजीराजे भोसले यांनी दिला. शिव-शाहू यात्रेनिमित्त शहरातील मामा चौकात आयोजित मराठा आरक्षण सभेत ते बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिव-शाहू रथयात्रा सध्या मराठवाड्यात आली आहे. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, अखिल भारतीय छावाचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर,देवकर्ण वाघ, किशोर चव्हाण, विठ्ठल माने, देवकर्ण वाघ, अमोल कोल्हे आदींची उपस्थिती होती. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात आरक्षण देताना त्यात मराठा समाजाचा समावेश केला होता. राज्यात शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे नाव केवळ सोयीसाठी वापरले जाते, अशी टीका संभाजीराजे यांनी केली. मराठा आरक्षण, गड-किल्ल्यांचे संवर्धन, शेतकरी, कष्टकर्‍यांचे प्रo्न आदींबाबत दबावगट तयार करणार आहेच शिवाय वेळ पडली तर रायगडावर उपोषणास बसण्याची आपली तयारी असल्याचे संभाजीराजे म्हणाले. प्रवीण गायकवाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.