आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदामांचे वेळेत कामच नाही, शासनाने घेतले २४ लाख परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील परळीच्या टोकवाडीसह शिरूर व पाटोदा या तालुक्यांच्या गोदाम बांधकामासाठी २४ लाख ४५ हजार ९७६ रुपयांचा आलेला निधी खर्च न झाल्याने राज्य शासनाने हा निधी परत काढून घेतला आहे. दैवाने दिले, पण कर्माने नेले, असाच काहीसा प्रकार घडला असून तीन तालुक्यांत गोदाम बांधकामाचा प्रश्न एेरणीवर आला आहे.
राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, सातारा, बीड, हिंगाेली, नागपूर, जळगाव, नगर, नंदुरबार, अमरावती, अकाेला, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतील गाेदाम बांधकामासाठी २०११-२०१२ ते २०१४-२०१५ या वर्षांत निधी वाटप केला होता. राज्य शासनाने बीड जिल्ह्यासाठी २४ लाख ४५ हजार ९७६ मंजूर केलेला निधी खर्चच झाला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तो निधी खात्यावर तसाच पडून राहिला. आता आलेला निधी काेणत्या कामासाठी हाेता, परंतु तो का खर्च झाला नाही? अशा अनेक प्रश्नांची विभागास कारणे विचारली जाणार अाहेत.
राज्य शासनाने १५ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील गाेदाम बांधकामासाठी वितरित करण्यात अखर्चित राहिला त्यामुळे काढून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे होता. दरम्यान, २१ नाेव्हेंबर २०१६ राेजी शासनाचे उपसचिव उ. द. वाळुंज यांनी अखर्चित रक्कम काढून घेण्याचा अध्यादेश २१ नाेव्हेंबर २०१६ राेजी काढला अाहे.
आता परळी तालुक्यातील टाेकवाडी, शिरूर अाणि पाटाेदा तालुक्यांचा समावेश अाहे. निधी उपलब्ध असूनही कामे का पूर्ण झाली नाहीत. निधी परत शासनजमा हाेणार असल्याने काेणत्या विभागाची दिरंगाई आहे, आता काेणावर कारवाई हाेणार, असा प्रश्न निर्माण झाला अाहे.

बीड जिल्ह्यातील गाेदामनिहाय निधी
परळी तालुक्यातील टाेकवाडी येथील एक हजार ८० मेट्रिक टन क्षमतेच्या गाेदामाचे बांधकाम कृषी उत्पन्न बाजार समितीत होत असून ८४ लाख ६९ हजार २८२ रुपयांचा निधी मंजूर झाला. हे गाेदाम बांधकाम पूर्ण झाल्याने ते जिल्हा पुरवठा विभागाने ताब्यात
घेतले अाहे. पाटाेदा येथील शासकीय रुग्णालयाच्या जवळील एक हजार ८० मेट्रिक टन क्षमतेचे गाेदाम बांधकाम सुरू असून त्यासाठी ९८ लाख ७३ हजार ३८३ रुपयांचा निधी मंजूर झाला होता; परंतु काम अद्याप अपूर्ण अाहे. तर शिरूर येथील बावी रस्त्याजवळ एक हजार ८० मेट्रिक टन क्षमतेच्या दाेन गाेदामांचा समावेश अाहे. यासाठी दाेन काेटी पाच लाख ४४६ रुपयांचा निधी मंजूर झाला अाहे. दाेन्ही बांधकामांचे काम २० टक्के काम शिल्लक राहिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार
जिल्ह्यातील टाेकवाडी येथील गाेदाम ताब्यात घेतले असून पाटाेदा अाणि शिरूर येथील बांधकामे प्रलंबित अाहेत. बीड व अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागास निधी खर्च करण्यास सूचना दिल्या.शिल्लक निधीसह माहितीसाठी पत्रव्यवहार केला अाहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला जाईल. - संताेष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी

तीन वेळा पाहणी करून गुणवत्ता ठरवावी
जिल्ह्यातील गाेदाम बांधकामाची कामे सुरू आहेत. त्याच कामांची गुणवत्ता ठरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी कमीत कमी तीन वेळेस भेट देऊन कामाची गुणवत्ता करावी. उत्कृष्ट असल्याची तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी अहवाल देण्याचे अध्यादेशामध्ये स्पष्ट केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...