आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने भाविक घटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाखेडच्या गोदावरी नदीचे पात्र पावसाळ्यातच कोरडेठाक पडले आहे. सुरुवातीच्या पावसाने पाणीपातळीत वाढच झालेली नाही. या वर्षी अधिक मास आल्याने या महिन्यात धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या भाविकांची पात्रातच पाणी नसल्याने गैरसोय होत आहे. परिणामी भाविकांची संख्या रोडावली आहे.
मागील तीन वर्षांपासून गोदावरी कधीच दुथडी भरून वाहिली नाही. पैठणपासून आंध्र प्रदेशपर्यंत वाळूमाफियांनी खड्डेच खड्डे केले, तर काही ठिकाणी नदीचा प्रवाहसुद्धा बदलला आहे. अधिक मासात गोदावरीत स्नान करण्याची धार्मिक परंपरा आहे. काही वर्षांपूर्वी अधिक मासात गोदावरीत पाणी नसेल, तर जायकवाडीतून नदीपात्रात पाणी सोडले जायचे. मात्र, जायकवाडी धरणातच पाणी नसल्याने व जागोजागी बंधारे झाल्याने गंगाखेडच्या गोदावरीत पाणीच नाही.
येथील गोदापात्रात अधिक मासानिमित्त व इतर धार्मिक विधींसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेशसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात, परंतु मागील दोन वर्षांपासून गोदापात्रात वाहते पाणी नाही. मुळी बंधाऱ्यामुळे खळी येथील गोदावरीच्या पुलाजवळ भाविक विधी करू लागले. अधिक मासात खळी पुलाजवळील साठाही संपला आहे.
बातम्या आणखी आहेत...