आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी नदीपात्राची स्वच्छता; मेटे महाराज यांच्या नेतृत्वाखाली युवकांची मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- तालुक्यातील कायगाव येथे गोदावरीच्या घाटावर गुरुवारी जनार्दन मेटे महाराज यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी स्वच्छता मोहीम राबवून घाट परिसर स्वच्छ केला.
गुरुवारी सकाळी जनार्दन मेटे महाराज यांनी श्रीक्षेत्र देवगड येथील भास्करगिरी महाराज यांच्याकडून गोदावरी स्वच्छतेची रूपरेषा समजून घेतली. कायगाव व गंगापूर येथील युवकांना गोदावरीच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक तरुण स्वेच्छेने या कामात सहभागी झाले. गोदाघाटावर दररोज धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून टाकण्यात येणारे कपडे, कचरा यामुळे गोदावरी दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत अाहे. या ठिकाणी कपडे व इतर घाणीमुळे तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या वेळी कायगावचे सरपंच अनिल उचित, शिक्षक आयुब शेख, नानासाहेब पाटेकर, अनिल बिरुटे उपस्थित होते.
मदतीचे आवाहन : याप्रसंगी जनार्दन मेटे महाराज यांनी सांगितले की, आज अतिशय अल्प खर्चात तरुणांच्या सहकार्याने गोदाघाट स्वच्छ केला आहे.