आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राक्षसभुवन येथील शनिला तब्बल 10 वर्षांनी गोदावरी नदीच्या पुराने वेढले, बुध-शुक्राचे मंदिरही पाण्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. - Divya Marathi
राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे.
गेवराई- तालुक्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल 10 वर्षानंतर राक्षसभुवन येथील श्रीक्षेत्र शनि मंदीरात गोदावरी नदीली आलेल्या पुराने वेढले होते. या परिसरातील पांचाळेश्वर येथील दत्त मंदिरही पूर्णपणे पाण्यात गेले होते.
 
गेवराई तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे राक्षसभूवन येथे विधीसाठी आलेल्या नागरिकांना पाण्याअभावी अडचणी निर्माण होत असत दरम्यान तालुक्यातील सर्वच ठिकाणी शनिवार व रविवार रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले असून या झालेल्या पावसाने गोदावरी नदीला पूर आल्याने रविवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शनि मंदिराला गोदावरी नदीच्या पाण्याने वेढले होते. सायंकाळी सहा वाजता मंदिरातील पाणी कमी झाले आज (सोमवार) अमावस्या असल्याने भाविकांना शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
 
शनिदेवाच्या साडेतीन पीठापैकी एक
राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी प्राचीन काळी दंडकारण्य होते असा उल्लेख पुराणातही आढळतो. गोदावरीच्या तिरावर विज्ञान गणेशाचे मंदिर आहे. विज्ञान गणेशाची स्थापना श्री दत्ताने केली होती.

पेशव्यांनी केला होता विठ्ठल सुंदरचा वध...
10 ऑगस्ट 1763 रोजी थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा निर्णायक युद्धात सडकून पराभव केला होता. तसेच निजामाचा सेनापती विठ्ठल सुंदर हासुद्धा या युद्धात मुत्युमुखी पडला होता. ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... गोदावरीच्या पाण्यात गेलेल्या राक्षसभुवन येथील शनि मंदिराचा व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...