आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय भवानीच्या जयघोषात भवानी तलवार महापूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष, संबळ-झांजाचा नाद आणि भाविकांनी उत्साहाने ओसंडून वाहत असलेली नगरी, असा त्रिवेणी संगम साधत कुलस्वामिनी मंगळवारी आई तुळजाभवानीची भवानी तलवार रथालंकार महापूजा मांडण्यात आली. नवरात्र आणि मंगळवारचा येाग साधत भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भवानी तलवार रथालंकार महापूजेचे रूप पाहत भाविक धन्य झाले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना भवानी तलवार द देताना जगजननी शक्तीदेवता तुळजाभवानीच्या पराक्रमी रूपाचे मंगळवारी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. हे चैतन्यदायी रूप भाविकांच्या दर्शनासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले होते. नवरात्रोत्सवातील आठव्या माळेदिवशी मंगळवारी कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील भाविकांनी देवीदर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने दर्शन मंडपासह वाहनतळावरील बॅरिकेट्स भरभरून वाहत होते. दुपारच्या सत्रात भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती. भवानी ज्योत नेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्यानंतर घटस्थापनेपासून पहिल्या दोन दिवसांत भाविकांची गर्दी कमी होती. परंतु, शुक्रवारपासून भाविकांच्या गर्दीत वाढ झाल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
देवीची परडी माळ घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.