तुळजापूर- सोमवार (दि. १५) पासून तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होत आहे. अश्विन प्रतिपदेपर्यंतच्या निद्रेनंतर २५ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल. त्यानंतर दुपारी घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास
प्रारंभ होणार आहे.
नवरात्रोत्सवापूर्वी देवीची ८ दिवसांची मंचकी नदि्रा असते. त्यानुसार सोमवारी सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीची मूर्ती शेजघरातील पलंगावर नदि्रिस्त करण्यात येते. यानंतर देवीच्या सर्व नित्योपचार पूजा पलंगावरच करण्यात येतात. अश्विन प्रतिपदेला २५ सप्टेंबर रोजी पहाटे देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येऊन दुपारी १२ वाजता घटस्थापनेने
नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. तत्पूर्वी साेमवारी सकाळपासूनच देवीचा पलंग घासूनपुसून धुऊन साफ करण्यात येतो. दुपारी परिसरातील आराधी महिला कापूस पिंजून देवीच्या गाद्या नदि्रेसाठी तयार करतात.
दहा दिवस निद्रा
कालाष्टमी सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस आल्याने तसेच मंगळवारी सायंकाळी कालाष्टमी संपत असल्याने या वेळी देवी ८ दिवसांऐवजी १० दिवस मंचकी नदि्रा घेणार आहे, तर सीमोल्लंघनानंतर देवी ५ ऐवजी ४ दिवस नदि्रा घेणार आहे.