आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांनंतर सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील बाजारपेठेत ग्राहकांकडून सोने खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात झालेली घसरण आणि अनुकूल पावसामुळे खरेदीदार उत्साहित असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दसऱ्याला सोने खरेदी करण्याला सर्वसामान्य पसंती देत असतात. यंदा भावही गडगडल्याने हा उत्साह दिसून आला.
ऐन दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर भाव कमी झाल्याने सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे. त्यामुळे ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीदारांची लगबग होती. लातुरातील सर्वच सोन्यांच्या दुकानांमध्ये कमीअधिक प्रमाणात ग्राहकी होती. शहरात पाचशेवर सोन्याची दुकाने आहेत. त्यात ३०० सराफा, तर २५० सुवर्णकार आहेत. अर्धा, एक, पाच ते १० ग्रॅम आणि बांगड्या, पाटल्यांना ग्राहकांची मागणी होती. बहुतांश खरेदीदार हे शहरातील व्यापारी, खासगी व सरकारी कर्मचारीच होते. मुहूर्त साधत जेमतेम खरेदी झाल्याने गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणारे अपवादच असावेत.
यंदा चांगला पाऊस झाला असला तरी शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. एेन काढणीच्या वेळीच पावसाचा फटका बसल्याने ग्रामीण भागातील खरेदीदार सोने खरेदीसाठी बाजारात आले नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामानंतरच शेती व्यवसायावर आधारित ग्राहक सोने खरेदीसाठी येईल,असे बाजारातून सांगण्यात आले. परंतु तीन वर्षांनंतर यंदा बाजारात
मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली, हे मात्र नक्की. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे. मंगळवारी लातुरात १० ग्रॅम सोन्याचा भाव ३० हजार ३०० रुपये होता. दोन दिवसांपूर्वी तो ३१ हजार २०० होता.

नेमकी उलाढाल किती?
दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीची झालेली उलाढाल नेमकी सांगणे अवघड आहे. व्यापारी वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. कोणी चार किलो, तर कोणी त्यापेक्षा दुप्पट करून सांगत आहे. परंतु सरासरी सहा किलो सोन्याची विक्री झाली असण्याची शक्यता आहे. यंदा पावसामुळे हा उत्साहा दिसला.
ग्राहकी वाढली
^तीन वर्षांनंतर यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहाकांचा सोने खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच दुकानांत रेलचेल होती. त्यामुळे काही दिवसांपासून मंदावलेली उलाढाल वाढली. भावात झालेली घसरण आणि पावसामुळे सोन्याला मागणी आहे.
विश्वनाथ किणीकर, अध्यक्ष, सुवर्णकार मंडळ
बातम्या आणखी आहेत...