आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्ता विचारण्याचा बहाणा करून लूट, अंबाजोगाई शहरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी अंबाजोगाई शहरातील हाउसिंग सोसायटीतील महिला सुमन गजानन वैद्य यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे गंठण लांबवले. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजता घडली. तर तहसील कार्यालयात वृद्ध महिलेचे दागिने चोरांनी लांवबले.

अंबाजोगाई शहरात आठवड्यात दोन महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने चाेरांनी लांबवल्याचा प्रकार ताजा असतानाच घटनेनंतर सोमवारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजाभाऊ औताडे यांच्या पेट्रोल पंप व्यवस्थापकास चोरांनी मारहाण करून रोकड लांबवली होती. या घटना ताज्या असतानाच मंगळवारी सकाळी ७ वाजता पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी अंबाजोगाई शहरातील हाउसिंग सोसायटी भागातील सुमन गजानन वैद्य यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण पळविले.

शहरात आठवड्यातील तिसरी घटना
साखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही महिन्यांत अशा घटना घडूनही छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आठ दिवसांपूर्वीच
प्रशांतनगर भागात चोरीची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आधार कार्ड काढून देतो म्हणून फसवले
दुसरी घटना अंबाजोगाई शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात घडली. लक्ष्मीबाई पानखडे (८०, रा. खडकपुरा, अंबाजोगाई) ही वृद्ध महिला काही कामानिमित्त तहसील कार्यालयात आली तेव्हा तिच्याजवळ एक भामटा आला. तुमचे आधार कार्ड काढून देतो म्हणून लक्ष्मीबाईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने त्याने लांबवले.
बातम्या आणखी आहेत...