आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडलेश्वर गोपालनंदगिरी महाराजांचे हृदयविकाराने निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परसोडा, शिवराई - 1008 महामंडलेश्वर स्वामी गोपालनंदगिरीजी महाराज (55) यांचे शुक्रवारी हृदयविकाराने देहावसान झाले. शनिवारी दुपारी एक वाजता शिवराई येथील सिद्ध गणेश मंदिरात त्यांचा समाधी सोहळा पार पडला. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
गोंडेगाव (ता. श्रीरामपूर) येथे भागवत सप्ताहाचे वाचन सुरू असताना 11 ऑक्टोबर रोजी गोपालगिरीजी महाराजांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते ब्रह्मलीन झाले. शनिवारी दुपारी शिवराई येथे त्यांचा समाधी सोहळा पार पडला. या वेळी शांतीगिरी महाराज, बालगिरी महाराज, आमदार आर. एम. वाणी, डॉ. दिनेश परदेशी, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह हजारो भक्त उपस्थित होते.
, संजय निकम, प्रशांत सदाफळ, राजेंद्र चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकरांसह साधू-संतांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या वेळी हजारो भक्त उपस्थित होते.
अल्प परिचय :
स्वामीजी मूळचे वैजापूर तालुक्यातील बल्लाळीसागजचे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज येथील आश्रमात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. आध्यात्मिक शिक्षणासाठी त्यांनी काशीला प्रयाण केले. काशी येथील गीता मंदिरात राहून त्यांनी काशी विश्वविद्यापीठाची वेदांतशास्त्रात पीएचडी पदवी घेतली. निरंजन आखाड्याने त्यांना महामंडलेश्वर पदवी दिली होती. स्वामींचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. धर्म व विज्ञानाची सांगड घालून कसे आचरण करावे, याची दीक्षा त्यांनी भक्तांना दिली होती. त्यांनी अनाथ, गरजू मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले होते.