आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde And Dhananjay Munde May Contest Loksabha Polls Against Each Other In Beed

धनंजय मुंडेंचा राजीनामा, पंकजा मुंडेंविरुद्ध निवडणूक लढण्‍याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- लोकसभा निवडणुकीत बीड जिल्‍ह्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुंडे काका आणि पुतण्‍या यांच्‍यात थेट लढत होण्‍याची शक्‍यता आधी वर्तविण्‍यात येत होती. आता चुलत भाऊ-बहीणीत राजकीय द्वंद्व रंगण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्‍या विरोधात जाऊन भाजपमधून बाहेर पडलेले त्‍यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे यांना आता परळी येथून उमेदवारी देण्‍याची तयारी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

धनंजय मुंडे यांनी आज दुपारी विधान परिषद सदस्‍यत्त्वचा राजीनामा दिला. पक्ष सांगेत तिथून आणि कोणाहीविरुद्ध निवडणूक लढविण्‍यास तयार असल्‍याचे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्‍यानंतर सांगितले. सध्या परळी मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र धनंजय मुंडेंसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मतदार संघ मागून घेऊ शकते. त्यामुळे परळीमध्ये मुंडेविरुध्द पालवे अशी सामाना रंगण्याची शक्यता आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरुन राजकारणात आलेल्या धनंजय यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेच्‍या वर्चस्‍वाला आव्‍हान देण्‍याच्‍या तयारीत आहे. त्‍यामुळेच लोकसभेच्‍या रणनितीमध्‍ये काका आणि पुतण्‍यांना एकमेकांविरुद्ध लढविण्‍याची योजना अजित पवारांनी आखली आहे. तर दुस-या समीकरणानुसार धनंजय यांना पंकजा पालवेंविरुद्ध उमेदवारी देण्‍याची शक्‍यता आहे. एक मात्र नक्‍की, की मुंडे कुटुंबामध्‍येच राजकीय सामना आगामी निवडणुकीत दिसणार आहे.