आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde At Press Conference Parali Marathwada

'बीड जिल्ह्यात मला दुबळं करण्यासाठीच घरफोडीची विरोधकांची खेळी'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर: गेली 25 वर्षे मी राज्यासह बीड जिल्हावासियांची सेवा करीत आहे. परळीतील पाच टक्के जनता राष्ट्रवादीकडे गेली तरी काही फरक पडत नाही. अजून 95 टक्के जनता माझ्यासोबत आहे, असे सांगून माझ्याच जिल्ह्यात मला दुबळं करण्यासाठीच राष्‍ट्रवादीने 'घरफोडी'ची खेळी रचली असल्याचा आरोप भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला. ते गुरुवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलत होते.
माझ्या पुतण्याचे मी सगळे लाड पूर्ण केले. परंतु, त्याने पदाच्या लालसेपोटीच पक्षासोबत बंडखोरी केली. माझ्या कुटुंबियांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले, पंचायत समितीचे सभापतीपद दिले, आमदारकीही दिली. पण त्यांनी जे करायचे तेच केले, असे मुंडे यांनी सांगितले. माझे थोरले बंधू पंडितअण्णांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला म्हणून मी भांडत बसणार नाही. मला राजकीय वाद कौटुंबिक पातळीवर न्यायचा नाही, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी थोडा अभ्यास करण्याची गरज
मुख्यमंत्री अजित पवारांनी घरफोडीचा शाब्दिक अर्थ घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अजून थोडा अभ्यास करण्याची गरज असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. घर सोडणारा चुकतो घरात राहणारा चुकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांची चूक क्षमा करण्‍यायोग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पैसे देऊन विरोधकांनी गर्दी जमविली
राष्ट्रवादीने पैसे देऊन परळीत गर्दी जमविली होती. आचारसंहितेचा हा भंग असल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले. याबाबत निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
घरं फोडायला आम्ही दरोडेखोर आहोत काय- अजित पवार
'परळीतील चांडाळ चौकडीविरोधात माझी प्रामाणिकपणाची लढाई'
धनंजय मुंडेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा - मुनगंटीवार