आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रझा अकादमीवर बंदी घाला- खासदार गोपीनाथ मुंडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- मुंबई येथील रझा अकादमीचा मोर्चा सत्ताधार्‍यांनीच घडवून आणला. रझा अकादमीवर शासनाने त्वरित बंदी घालावी, अशी मागणी करीत भ्रष्टाचाराने जनता त्रस्त झाली आहे, आता महिलांनी तीव्र आंदोलन केले पाहिजे, ज्यात हे भ्रष्ट सरकार जळून भस्म होईल, असे आवाहन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा कार्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय संघटन मंत्री खासदार दर्शना जरदोश, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर, सरचिटणीस उमा खापरे, विजया राहटकर, शिल्पा पटवर्धन, मनीषा चौधरी, चैतन्यबापू देशमुख, संभाजी पवार, राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.
खासदार मुंडे म्हणाले की, सध्या महिलांवरील आत्याचार आणि महागाई हे दोन ज्वलंत प्रश्न आहेत. महिलांवरील आत्याचारात महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य आहे. असे असूनही आपले गृहमंत्री महिलांवरील आत्याचाराची साधी दखल घेत नाहीत, त्यावर कारवाई करणे दूरच. गृहमंत्री अत्याचाराबाबत इतके त्रयस्थ आहेत की, त्यांची कॉन्स्टेबल म्हणूनही नेमणूक होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
ते म्हणाले की, घरात बसून लढाई करण्याचे दिवस आता गेले आहेत. महिलांनी रस्त्यावर येऊन संघर्ष केला पाहिजे. पुढची दोन वर्षे संघर्षाची आहेत.
महिला मोर्चाने संघटितपणे संघर्ष करून संघटना बांधणी करावी. नांदेड महिला मोर्चाच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांना तलवारी भेट देण्यात आल्या आहेत. महिलांनी नांदेड शाखेचा हेतू ओळखून दिल्लीपर्यंत संघर्ष केला पाहिजे. या तलवारी महिलांनी एकमेकांविरुद्ध वापरू नये, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
स्ताविकात नीता केळकर यांनी महिला मोर्चा कार्य समितीच्या बैठकीची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, महागाईचे सर्वात जास्त चटके महिलांना बसतात. त्यासाठी महिलांना महागाईविरुद्ध लढाई जिंकली पाहिजे. या कार्यक्रमास राज्यभरातून महिला मार्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.