आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडले - गोपीनाथ मुंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - एकीकडे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा यूपीएच्या प्रचार सभेचे अध्यक्ष करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण बदल काँग्रेसला निश्चितच पराभवाच्या दिशेने नेणारा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडले असून त्यांचा पक्ष या कल्पनेने लोकसभा निवडणूक लढवत आहे, पण या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाच जागा मिळतील, अशी माहिती खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
बीडमध्ये 16 फेब्रुवारीला महायुतीच्या महाएल्गार सभेच्या निमित्ताने चहावाल्यांना सभेसाठी निमंत्रण देण्यासाठी खासदार गोपीनाथ मुंडे शुक्रवारी दुपारी चार वाजता बीडमध्ये आले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, काल देशाच्या संसदेत जो प्रकार घडला तो लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर मूल्यांची जपवणूक करावी लागेल. नितीन गडकरी यांचा मी अनुयायी आहे. ते आमचे राष्ट्रीय नेते आहेत. आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रश्नावरून त्यांच्यात व माझ्यात कोणतीच विरोधाची भूमिका नसल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

28 फेब्रुवारीला जागावाटप
महायुतीच्या जागांचे अजून वाटप झालेले नाही. माढय़ाची जागा भाजपकडेच आहे. येत्या 28 फेब्रुवारीला जागांचे वाटप होणार आहे. त्या वेळी पाच जणांची महायुतीतील समिती माढय़ाच्या जागेचा निर्णय घेईल. महायुतीची तिसरी महासभा डोंबिवली येथे 23 फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं व स्वाभिमानी आघाडी हे पाच पक्ष मिळून पाच पांडव झाले आहेत.