आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडेंचे मोठेपण विरोधकांनाही मान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा थक्क करणारा प्रवास गोपीनाथ मुंडे नावाच्या वादळाने तहहयात समाजजीवनातच घालवला ! तळागाळातून पुढे आलेला नेता राष्ट्रीय राजकारणात गरुडझेप घेऊन विरोधकांना सळो की पळो करत असल्याचे पाहून फोडाफोडीचे राजकारण करून जिल्ह्यातच कोंडी करण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंडेंनी लोकसभा निवडणुकीत सणसणीत चपराक दिली! केंद्रात ग्रामविकाससारखे मंत्रिपद मिळवून विधानसभेतही राष्ट्रवादीला चारी मुंड्या चीत करण्याचे नियोजन करणार्‍या मुंडेंचे अकाली निधन झाले आणि मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडेंची महती अखेर मान्य करत लोकसभा पोटनिवडणुकीत मुंडेंचा वारसदार बिनविरोध निवडून देण्याचे एकदाचे जाहीर करून टाकले.

गोपीनाथ मुंडे या समाजातील देवमाणसाचे अचानक निघून जाणे, हेच सामान्यातील सामान्यांनाही मान्य होत नाही. आजही मुंडेंच्या जिव्हाळ्याचा विषय जिल्ह्यात घरोघरी निघतो आणि केवळ औषधगोळ्यांवर संपूर्ण शरीर अवलंबून असले तरी ते कोणालाच कधीही भासू न देणार्‍या मुंडेंच्या आठवणी काढून लहानथोरांच्या डोळ्यांतून अश्रू घळघळू लागतात. तरुणाईतदेखील स्वत:ची क्रेझ निर्माण करण्यात आणि लहानमोठ्यांच्या खांद्यावर सहजगत्या हात टाकून मोठेपण देऊन त्याला जिव्हाळा लावणारे गोपीनाथ मुंडे कोणा एका समाजाचे नव्हे तर सकळांचेच होते, हे त्यांच्या मृत्यूपश्चात सगळ्यांनाच उमगू लागले आहे. मुंडे केंद्रात मंत्री झाल्यानंतर मला आता विकास काय असतो, हे जिल्हावासीयांना दाखवून द्यावयाचे आहे, तुम्ही थोडं थांबा आणि पाहा, असे म्हणत. मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही.

एकतर्फी निकालाच्या शक्यतेने उचलले पाऊल
मुंडेंच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत कोणताही उमेदवार मैदानात उतरला तरी जनताच एकतर्फी निकाल देईल, हे स्पष्ट आहे. मुंडेंच्या निधनानंतर आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि मुंडेंच्या राजकीय वारसदार पंकजा पालवे यांना मुंंडेंच्या जागी मंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली होती. बीडचे राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनीदेखील पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अशीच मागणी केली होती.