आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, BJP, Ashok Chavan, Congress, Modi

अशोक चव्हाणांचा पराभव निश्चित, गोपीनाथ मुंडे यांचा विश्‍वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - अशोक चव्हाणांचा पराभव या सभेने निश्चित केला आहे. राज्यातून 40, तर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जागा महायुतीकडे खेचून नरेंद्र मोदींच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करू, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला.मराठवाड्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदेडात रविवारी (दि.30) झालेल्या जाहीर सभेत सर्वांच्याच टीकेचे लक्ष्य अशोक चव्हाण व त्यांचा आदर्श घोटाळा हेच राहिले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसह राज्याच्या राजकारणातील महायुतीची नेतेमंडळी ते नांदेड लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी या सर्वांनीच अशोक चव्हाणांच्या कामांवर कडाडून टीकास्त्र सोडले.


रविवारी सकाळपासूनच नांदेड शहराचे रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रत्यक्षात 12 वाजता सभा सुरू होणार असताना नऊ वाजेपासून जत्थेच्या जत्थे गुरुगोविंदसिंग स्टेडियमकडे जात होते. साडेबारा वाजता संपूर्ण स्टेडियम खचाखच भरून बाहेरही मोठा जनसमुदाय होता. स्थानिक नेतेमंडळींची भाषणे सुरू करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख, नांदेडचे प्रभारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. विजय गव्हाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रल्हाद इंगोले, भाजप सभेतच प्रवेश केलेले राम चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे रामचंद्र येईलवाड, उमेदवार डी. बी. पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, प्रकाश शेंडगे आदींची भाषणे झाली. सर्वांनीच आपल्या भाषणात नांदेडचा विकास हा नावालाच झाल्याचे सांगून यातून केवळ अशोक चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी भ्रष्टाचारच केल्याचा आरोप केला.
खासदार रामदास आठवले यांनी देशात चुकीच्या पद्धतीने मोदींबाबत चित्र रंगवले जात आहे. परंतु दलित जनतेलाही विश्वास निर्माण झाल्याने ती मोदींच्याच पाठीशी असल्याचे ते म्हणाले.


शेतक-यांना नाही, पण अशोकरावांना संरक्षण
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील झंझावाताने व आजच्या जाहीर सभेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ होणार. या राज्यात शेतक-यांना नाही, पण अशोकरावांना संरक्षण दिले जाते. त्यावरून येथे भ्रष्टाचाराला संरक्षण असल्याचे काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीने सिद्ध केले असून जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.
देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजप