आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी, बाळासाहेब सुटलो; शरद पवारच राहिलेत!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - ‘आम्हाला काकांपासून वाचवा !’ अशी हाक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी वैजनाथ येथून मारली खरी; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता गोपीनाथ मुंडे आम्ही दोघेही पुतण्यांपासून सुटलो आहोत. अजित पवारांचे काका शरद पवार हेच राहिलेत. त्यामुळे सगळेच पुतणे नव्हे, तर अजित पवारच काकांना वैतागले असून त्यांच्या मनात होतं ते समोर आलं, असा पलटवार भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला.
बीड जिल्ह्यातील हे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर घरातच भेद झाल्याने जिल्ह्यातच ठाण मांडून आहे. खासदार मुंडे आणि कन्या आमदार पंकजा पालवे रोज परळीसह जिल्हाभर फिरत आहेत. शनिवारी मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
परळी वैजनाथ येथे पंडितअण्णा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खासदार मुंडेंनी सडेतोड उत्तर दिले. ‘वय झालं आहे, आता मुंडेंनी रिटायर व्हावं,’ या पवारांच्या वक्तव्यावर पलटवार करताना खासदार मुंडे म्हणाले, ‘माझं वय सध्या 61 आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचं मात्र 71 वर्षे एवढं वय झालं आहे. मग मी रिटायर्ड व्हावं की पवारांनी हे त्यांनीच जाहीर करावं. कुणाच्या वयावर, स्वभावावर टीका करणं हे राजकारणातील चांगलं लक्षण नाही. विवेक, संयम सोडून अजित पवार सध्या बोलत आहेत. हे योग्य नाही.’ केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि खासदार मुंडे यांची मैत्री संपवणे अजित पवार के बस की बात नहीं...! लातूरच्या मैत्रीमुळे काहीही गमावलं नाही. याउलट विलासराव मुख्यमंत्री असताना परळी-बीड-नगर लोहमार्गासाठी राज्य सरकारने पन्नास टक्के खर्च उचलण्याचा निर्णय घेतला तो केवळ माझ्या आग्रहामुळे. विलासराव देशमुख यांची आणि माझी मैत्री जगजाहीर आहे; परंतु शरद पवार आणि आपली मैत्री नसून प्रत्येक वेळी आपण राजकारणात संघर्षच केल्याचे खासदार मुंडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान, माजलगावचे शेकापचे भाई गंगाभिषण थावरे यांनी मुंडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
शरद पवार सुसंस्कृत
उपमुख्यमंत्री काहीही वक्तव्य करत असले तरी शरद पवार सुसंस्कृत राजकारणी आहेत. प्रत्येक प्रश्नाबाबत ते सकारात्मक असतात. कुणातही नाक खुपसणारे नाहीत.
गोपीनाथ मुंडे, खासदार.
मला संपवण्यासाठी तीनदा जन्म घ्यावा लागेल- गोपीनाथ मुंडे
'घर का फुटलं? याचे गोपीनाथ मुंडेंनी आत्मपरिक्षण करावे'
गोपीनाथ मुंडेंच्या वक्तव्यावर पुतण्याचा पलटवार