आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचे निधन, आज सायंकाळी अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि पंडितआण्णा मुंडे यांच्या मातोश्री लिंबाबाई पांडूरंग मुंडे यांचे आज (मंगळवार) पहाटे निधन झाले. त्या 102 वर्षांच्या होत्या.
लिंबाबाई मुंडे यांचे वृद्धापकाळाने आज पाहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे मुलगा, नातू विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, नात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे असा मोठा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...