आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gospel Of Kaamsutra Shooting Schedule Completed In Verul

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गॉस्पेल ऑफ कामसूत्रा’चे वेरूळ लेणी परिसरात चित्रीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरुळ- प्रसिद्ध लेखिका पूनम उत्पल लिखित ‘गॉस्पेल ऑफ कामसूत्रा’ या पुस्तकावर आधारित डाक्युमेंटरी छायाचित्रणाचे काम वेरूळ लेणीत पार पडले. या डाक्युमेंटरीचे चित्रीकरण याआधी खजुराहो येथील लेणींमध्ये झाले आहे. या फिल्मची निर्मिती मुंबई येथील व्यंकटेश फिल्म्स करत आहेत. निर्माता म्हणून किरण नायडू व दिग्दर्शक म्हणून व्यंकटेश नायडू हे काम पाहत आहेत. यात मुख्य भूमिकेत स्वत: लेखिका पूनम उत्पल दिसणार आहेत. येत्या 2 ऑक्टोबरपासून ही डाक्युमेंटरी फिल्म सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

कोण आहेत पूनम उत्पल
लेखिका व मॉडेल पूनम यांचे गॉस्पेल ऑ फ कामसूत्र हे पहिलेच पुस्तक आहे. त्यांचा यूएस येथे फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. स्वत:ला लाँच करण्यासाठी त्यांनी पुस्तकावर आधारित डॉक्युमेंटरीत भूमिका केली आहे. त्या दोन वर्षांपासून भारतातील आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सांभाळतात.