आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाचे पेशी नमुने प्रयोगशाळेकडे; बिंदुसरेच्या पात्रातील अर्भक प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- बिंदुसरा नदीपात्रात गुरुवारी सापडलेल्या अर्धवट अर्भकाचे पेशी नमुने डीएनए तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामार्फत पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. अर्भकाचा छाती खालील भागच नसल्याने ते स्त्री की पुरुष असा संभ्रम  निर्माण झाला असून त्याच्या गुणसूत्रांची तपासणीही करण्यात येणार आहे. 
 
गुरुवारी दुपारी  बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात अर्भकाचा अर्धवट देह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात माता-पित्यावर  बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्या मातेचा शोध घेतला जात आहे. मागील तीन दिवसांत जिल्ह्यातील  खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या प्रसूतींची माहिती मागवण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले. अर्भकाचे पेशी नमुने डीएनए तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले असून अर्भकाच्या शरीराचा वरचा भाग सापडल्याने ते स्त्री की पुरुष याबाबत संभ्रम असल्याने त्याच्या गुणसूत्रांची (क्रोमोसोम्स्) तपासणी करण्यात येणार असून यातून ते स्त्री की पुरुष हे कळणार आहे. प्रथमदर्शनी नको असलेले हे मूल असावे असा अंदाज आहे, परंतु तपास करण्यात येत असल्याचे उपअधीक्षक गणेश गावडे म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...