आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपा तलावात साधूच्या वेशातील मृतदेह सापडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
धारूर- तालुक्यातील भोपा येथील तलावात शुक्रवारी साधूच्या वेशातील मृतदेह आढळून आला. याप्रकरणी दिंद्रुड ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भोपा शिवारातील साठवण तलावालगत बीड-परळी राज्य मार्ग असून या तलावात शुक्रवारी दुपारच्या वेळी पाण्यावर तरंगताना  एक मृतदेह नागरिकांना आढळून आला. दिंद्रुड पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर प्रेत हे वृद्ध साधू वेशातील व्यक्तीचे असून ओळख पटली नसल्याचे दिंद्रुड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...