आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार ट्विटरच्या टिवटिवमध्ये रममाण,सुनील तटकरेंची घणाघाती टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - हे सरकार रस्त्यावरच्या आंदोलनापेक्षा ट्विटरच्या टिवटिवमध्ये रममाण झाले आहे. आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. प्रचंड असंतोष असतानाही मराठा समाजाने ज्या शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले आहेत ते कौतुक करण्यासारखे आहे. या राजकारणविरहित मोर्चांना मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे वळण देण्याचा प्रयत्न केला, ते अत्यंत दुर्दैवी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केली. पक्ष मेळाव्याच्या निमित्ताने तटकरे बुधवारी लातूरमध्ये आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, नगर परिषदा आणि मनपा निवडणुकांच्या प्रभाग रचनेवरून तीनदा निर्णय बदलला. अंतर्गत सुरक्षा कायदा अधिकाऱ्यांनीच तयार केला. आम्हाला तो माहीतच नव्हता, असे मुख्यमंत्री म्हणतात. यावरून राज्य सरकार अतिशय गोंधळलेले आहे, हे सिद्ध होते. सरकारला प्रश्नच कळत नाहीत. अधिकारी ऎकत नाहीत, असं मुख्यमंत्रीच सांगत आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कांदा ५ पैसे किलोने विकल्यानंतर सरकार प्रतिकिलो १ रुपयाचे अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा करतंय. कोपर्डीची घटना हाताळता न आल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...