आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य केंद्रातील रिक्त जागांची डोकेदुखी कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात रुग्णांना कर्मचारी-अधिकार्‍यांच्या रिक्त जागांमुळे वेळेत उपचार मिळत नाही. दोन आठवड्यांपूर्वी विरमगावात एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान उपकेंद्रात कर्मचार्‍यांअभावी होऊ शकले नव्हते. अखेर उपचारासाठी औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले असता डेंग्यूचे निदान झाले. गावात प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही कर्मचार्‍यांच्या रिक्त जागांमुळे उपचार न मिळण्याचे प्रकार वाढले असून याची दाखल शिवसेनेने घेत आठ दिवसांत प्राथमिक केंद्र व उपकेंद्रातील जागा भरण्यात याव्या अन्यथा शिवसेनेच्या वतीने केंद्रासह तालुका आरोग्य कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा तालुकाप्रमुख गणेश आधाने यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.
विरमगाव येथे मारुती अधाने या व्यक्तीला डंेग्यूची लागण झाली होती.

विरमगाव हे देवळाणा उपकेंद्राला जोडलेले असल्याने या उपकेंद्रात सर्वच जागा रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. मारुती अधाने या व्यक्तीला डेंग्यूची लागण झालेली असतानाही आरोग्य विभागाच्या वतीने एकही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचू शकला नव्हता, अखेरीस त्यास औरंगाबाद येथील दाखल केले होते.

अनेक वेळा मी १२ तास नोकरी करून घरी गेल्यास येणार्‍या रुग्णांना मी रुग्णालयात जाणूनबुजून गैरहजर असल्याचा गैरसमज होतो. गदाना प्राथमिक आरोग्य केंद्रास अनेक गावे जोडली असून बर्‍याच जागा रिक्त असल्याने या िठकाणी येणार्‍या रुग्णांची उपचाराकरता गैरसोय होते. - के.डी. बावस्कर, वैद्यकीय अधिकारी