आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Needs To Be Getting More Rain Udhao Thakre

चिखलफेक करण्यास चिखलासाठी पाणी नाही- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट ही मोठी आपत्ती आहे. यात सरकारचा पंचनामा करण्यात सध्या तरी आपल्याला रस नाही. चिखलफेक करण्याची ही वेळ नाही, कारण चिखल करण्यासाठी पाणीच नाही, असे स्पष्ट करीत सरकार पडण्यापेक्षा पाऊस पडण्याची गरज आहे, असेही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे नमूद केले.

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त ५० शेतकरी कुटुंबीयांना स्मृती या संस्थेमार्फत शिवसेनेने प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दिली. या वेळी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या वतीनेही ५० कुटुंबीयांना प्रत्येकी तीन शेळ्या व संगोपनासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री संजय राठोड, खा.संजय जाधव, आ.दीपक केसरकर, आ. विजय शिवतारे, आ.डॉ. राहुल पाटील, मीरा रेंगे, आ. तृप्ती सावंत आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण सरकारविरोधात काय बोलतो, याकडे सर्वांचे लक्ष असते. सरकार पडणार का, याचीच चर्चा जास्त होते. त्यामुळे संकटाच्या या काळात सरकारचा पंचनामा करण्यात आपल्याला रस नाही, सरकारमध्ये आम्हीही आहोत. चिखलफेक करण्याची ही वेळ नाही, कारण पाणीच नाही. चिखलासाठी पाणी आणून गोळे करावे लागतील, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठवाड्यावरील संकट मोठे आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

कन्यादान योजना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेनेने शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजना सुरू केली आहे. जालन्यात आज नोंदणीद्वारे तिची सुरुवात झाली. दुष्काळात मुलींच्या लग्नासाठी करावयाचा खर्च ही मोठी विवंचना पित्यासमोर असते. त्यामुळे शिवसेना या योजनेद्वारे मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.