आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Negligence Affected On Heritage Building

सरकारी अनास्थेमुळे ‘हेरिटेज’चे भग्नावशेष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- विविध ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांचा वारसा असलेल्या कन्नड तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळे शासनाच्या उदासीन धोरणामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. जागतिक स्तरावर महत्त्वाची असलेली पुरातत्त्व विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे विकासापासून कोसो दूर आहे. परिणामी येथे उपलब्ध होणा-या कोट्यवधींच्या रोजगारापासून स्थानिक वंचित आहेत. जागतिक वारसा हक्क दिनानिमित्त कन्नड तालुक्यातील ऐतिहासिक व प्राचीन धार्मिक स्थळांचा घेतलेला हा आढावा.

कन्नड तालुक्यात आशिया खंडातील सर्वात प्राचीन पितळखोरा लेणी, मराठवाड्याच्या सौंदर्यात भर घालणारा अंतापूरचा किल्ला, गणितज्ज्ञ भास्काराचार्यांची प्रयोगशाळा, वन्यजीव, औषधी वनस्पती, गौताळा अभयारण्य, हेमाडपंती मंदिरे, चालुक्यकालीन मंदिरे आदी अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. तालुक्यातील ही गौरवशाली असणारी स्थळे जगासमोर आणण्याची गरज आहे. तसेच विविध आदिवासी समाज संस्कृतीचे दर्शन येथे होते. कन्नडच्या उत्तरपूर्व भागात भिल्ल, ठाकर व बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर असून ते आजही आपली पारंपरिक संस्कृती टिकवून आहेत. तालुक्यातील स्थळे व संस्कृतीचा शासनाने विकास केल्यास येथे मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक नेत्यांच्या रेट्याची गरज असून त्यांच्या पुढाकाराने येथील जागतिक वारसा स्थळे जगाच्या नकाशावर येण्यास मदत होऊ शकते.

कन्नड तालुक्यातील पर्यटनस्थळांना चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू करावेत, असे विकास मंचाचे सदस्य संजय जाधव, धैर्यशील केरे, कृषिभूषण वसंत पवार, संतोष कोल्हे, धीरज पवार, नरेंद्र शर्मा, युवराज बनकर, डॉ. विनोद पाटे, प्रतिभा देसाई, अनिता शिंदे, डॉ. संजय गव्हाणे, राजेंद्र गव्हाणे, सचिन पवार आदींनी मागणी केली आहे.