आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालफितीमध्ये अडकलेल्या २५० विहिरींचा मार्ग मोकळा, मान्यता देण्याचे शासनाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - वैयक्तिक विहिरीचा लाभार्थी ज्या गावचा आहे त्याच गावच्या ग्रामपंचायतीने विहिरीच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश शासनाने दिल्याने लालफितीच्या कारभारात रखडलेल्या तालुक्यातील २५० विहिरींच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकरी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीने प्रशासकीय मान्यता द्यायची की शेतजमीन ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असेल तेथील ग्रामपंचायतीने, अशा या वादात अडीचशे लाभार्थींच्या विहिरींची कामे मागच्या चार वर्षांपासून रखडलेली आहेत. प्रशासकीय मान्यतेसाठी चार वर्षांपासून हे लाभार्थी पंचायत समितीकडे चकरा मारीत होते. विहिरी कधी सुरू होणार या गर्तेत अडकले होते. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले. यात लाभार्थी रहिवासी असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीने विहिरीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचा नियम असल्याचे सूचित केले आहे. तालुक्यात २०११-१२ मध्ये ५३१ वैयक्तिक सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली होती. २०१२-१३ मध्ये या विहिरींच्या कामांना शासनाने स्थगिती दिली होती. २०१४-१५ मध्ये १२७२ विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १८०३ विहिरींना मंजुरी मिळालेली असून २५७ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. ५८२ विहिरींची कामे प्रगतिपथावर अाहेत.

कोरडवाहू झाले आता बागायतदार
तालुक्यामध्ये आतापर्यंत झालेल्या रोहयोतील ९० टक्के सिंचन विहिरींना पाणी लागल्याने योजनेचा उद्देश पूर्ण झाला आहे. कोरडवाहू शेतकरी आता बागायतदार झाले आहेत.

सिल्लोड तालुका दुसऱ्या स्थानी
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातून या कामात सिल्लोडने आघाडी घेतली असून या कामात सिल्लोडचा दुसरा क्रमांक लागतो.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...