आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Polytechnique Girl Student Committed Suicide

तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, अभ्यासाच्या ताणामुळे उचलले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - बीडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या योगेश्वरी सपाटे (१८) हिने केज तालुक्यातील केवड येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. अभ्यासाचा ताण पेलवत नसल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

योगेश्वरी काही दिवसांपूर्वी गावी आली होती. रविवारी सकाळी साडेसहा वाजता प्रात:विधीस जाऊन येते म्हणून ती घराबाहेर पडली. गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतातील विहिरीत तिने उडी घेऊन आत्महत्या केली. या विहिरीजवळ केज पोलिसांना योगेश्वरीचा मोबाइल फोन आणि सुसाइड नोटही सापडली. अभ्यासाच्या ताणामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे तिने लिहिलेले आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.