आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Governor C. Vidyasagar Rao Visit To Osmanabad Farmers

दुष्काळी पाहणी हेलिकॉप्टरमधून, शासनाकडून शेतक-यांची थट्टा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - त्यांच्या दौऱ्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गेल्या आठ दिवसांपासून कामात गुंतली होती. ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार म्हणून जिल्हा प्रशासनाने शेतापर्यंत गाड्यांचा ताफा नेण्याचीही सोय केली होती. पण ते आले, मात्र बांधाजवळच थांबले. ते मोजक्याच शेतकऱ्यांच्या जवळ गेले. अवघी पाच मिनिटे संवाद साधून निघून गेले. मात्र, ते काय बोलले, हेच शेतकऱ्यांना कळले नाही. ऐन दुष्काळात शासनाकडून थट्टाच सुरू असल्याने शेतकऱ्यांचीही पुरती निराशा झाली.

सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या दौऱ्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले जावे.
जागतिक अर्थव्यवस्थेचा कल शहरी भागांच्या विकासाच्या बाजूने असल्याने ग्रामीण भाग विकासापासून वंचित आहे. त्यामुळे शेती बळकट करून ग्रामीण युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिले पाहिजे, असे मत राज्यपाल राव यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय ग्रामीण युवक महोत्सव समारोप कार्यक्रमात बोलत होते.