आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Grampanchayat Division Superident Robbery Caught

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेडच्या ग्रामपंचायत विभाग अधीक्षकास लाच घेताना पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - ग्रामसेवकाचे निलंबन मागे घेण्यासाठी लाच मागणा-या जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभाग अधीक्षक प्रियदर्शन मारोतराव वाघमारे यांना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेत 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.


धर्माबाद तालुक्यातील ग्रामसेवक राजेंद्र माधवराव मुपडे यांच्याकडे मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम देण्यात आले. या कामात कुचराई केल्याबद्दल मुपडे यांना सहा महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले. त्यानंतर मुपडे यांनी मतदार यादीचे काम पूर्ण केले. धर्माबाद तहसीलदारांनी त्याबाबतचा


अहवाल सादर केला.
जिल्हा प्रशासनाने मुपडे यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात जिल्हा परिषदेला सूचना केली. त्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे अधीक्षक प्रियदर्शन वाघमारे यांनी 20 हजारांची मागणी केली. यासंदर्भात शुक्रवारी तक्रार करण्यात आली.