आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८२ ग्रामपंचायतींच्या ऑगस्टमध्ये निवडणुका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींत निवडणुका होणार आहे. यात म्हारोळा, हमामपूर, पैठणखेडा, सोमपुरी, एकतुणी, दाभरूळ, ब्राह्मणगाव, आंतरवाली कडेठाण, पारचंडी, दरेगाव डोणगाव, कौदर कुतुबखेडा, दादेगाव, पांगला पाडळी, निलजगाव, गेवराई, कारकीन, विहामांडवा, चितेगाव, पिंपळवाडी, आपेगावसह ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागली आहे.

विद्यमान सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पाच वर्षे गावाचा विकास करता आला नाही. आता पुढे कामे करू, असे आश्वासन सरपंच पदाचे दावेदार गावकर्‍यांना देत आहेत, तर ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच पदासाठी इच्छुक मतदारांच्या भेटी घेताना दिसत आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना थेट ग्रामपंचायत कार्यालयात येत असल्याने ग्रामपंचायतीला महत्त्व प्राप्त झाले आहे, तर काही ग्रामपंचायती या एमआयडीसीसारख्या आर्थिक स्रोत असणार्‍या भागात येतात. यावर सरपंच चांगलेच सधन झाले. मात्र, त्यांचे गावाकडे दुर्लक्ष झाले. आता निवडणुका लागल्याने हीच मंडळी गावात ठाण मांडून बसली आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायती शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना होणार हे निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गावात या पक्षांची काय किंमत आहे हे कळणार आहे.

सध्या गावात याच पक्षांचे कार्यकर्ते सरपंच आहेत. पुन्हा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्या पाहिजे, असे आमदार संदिपान भुमरे तसेच माजी आमदार संजय वाघचौरे प्रयत्न करत आहेत. याची कसोटी ग्रामपंचायतीमध्ये लागणार आहे. एमआयडीसीतील ग्रामपंचायतीत विकासाची बोंब चितेगाव, इसारवाडी ही गावे एमआयडीसीमध्ये येतात. यातील अनेक गावांचा कायापालट विविध कंपनीने केला आहे. मात्र, कंपन्यांनी विकास केला. त्यावर येथील सरपंच हा विकास आम्हीच केला, असा दावा करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...