आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक: लातूरमध्ये महिला उमेदवाराचा स्वत:च्या गाडीखाली चिरडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या एका महिला उमेदवाराचा स्वत:च्याच गाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना पानचिंचोलीजवळ काल (बुधवारी) दुपारी घडली.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार संपत आला आहे. शेवटच्या टप्प्यात त्याला वेगही आला होता. तुपडी, सोनेसांगवी, दगडवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचीही निवडणूक लागली आहे.

या निवडणुकीत उमेदवार पद्मीनबाई माधवराव पाटील उभ्या होत्या. दगडवाडी येथील प्रचार संपवून त्या घराकडे परतत असताना नागोबा भोसले यांच्या घरी भेट देण्यासाठी त्या टाटा सफारी गाडीतून उतरल्या आणि गाडीच्या मागे गेल्या. याचवेळी चालकाने गाडी मागे घेतली, त्या गाडीखाली चिरडल्या गेल्या. त्यांच्या डोक्यावरुन गाडीचे चाक गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...