आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात दुधाळ येथे होणार लवकरच गुरुत्वाकर्षण प्रयोगशाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुत्वाकर्षण लहरींच्या अभ्यासातून विश्वनिर्मितीचे रहस्य शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी हिंगोली जिल्ह्यातील दुधाळ येथे प्रयोगशाळा उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपये खर्च येणार असून ४०० एकर जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे.

लिगो इंडिया कंपनीच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वीज, पाणी उपलब्धतेबाबत चर्चा झाली. या प्रकल्पाची प्राथमिक बोलणी करण्यासाठी या प्रकल्पाचे सल्लागार तरुण सौरदीप व शरद गावकर हे येथे आले होते. प्रयोगशाळा उभारण्यासाठी पोषक वातावरण असल्याचा अभ्यास भारत आणि अमेरिका येथील शास्त्रज्ञांनी केला असून त्यानंतर यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर परिसरात एक हजार शास्त्रज्ञ गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करू शकतील.

या प्रकल्पात ३७ भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. कृष्णविवरातील आघातांमुळे निर्माण झालेली ऊर्जाही तीन सूर्यांच्या ऊर्जेपेक्षा अधिक होती. सूर्यमालेतील गूढ उकलता येणे अधिक सोपे होऊ शकेल असे या प्रकल्पाचे सल्लागार शरद गावकर यांचे मत आहे.
डॉक्टरांना वेळेवर पगार नाही
प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन करणे, प्रकल्पासाठी लागणारी वीज, पाण्याची व्यवस्था करणे या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून लिगो इंडियाच्या शास्त्रज्ञांनी प्राथमिक चौकशी केली. औंढा ते सिद्धेश्वर धरण यादरम्यान उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी २ हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज आहे. यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत.
बातम्या आणखी आहेत...