आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Group Education Officer Arrested For Teacher Murder Case

शिक्षकाच्या खूनप्रकरणी गटशिक्षणाधिकारी अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई --पंचायत समितीच्या उपसभापतींचे स्वीय सहायक तथा शिक्षक राजेंद्र घाडगे यांचा शनिवारी रात्री गोळ्या झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना त्यांच्या जामखेड येथील घरातून रविवारी पहाटे अटक केली. दुसर्‍या आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत राजेंद्र बाबासाहेब घाडगे (42) शिक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच अभयसिंह पंडित यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांची प्रतिनियुक्ती झाली होती. शनिवारी रात्री सेंट झेवियर्स शाळेसमोरून ते घरी जात होते. घरापासून 200 फूट अंतरावर रात्री नऊच्या सुमारास अंधारात अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी किडनीत व दुसरी पायात घुसली. गंभीर जखमी झालेले घाडगे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

औरंगाबादेतून धमकी
20 दिवसांपूर्वी घाडगे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्या फोनवरून ही धमकी देण्यात आली तो औरंगाबादच्या गारखेडा परिसरातील रहिवासी दत्तात्रय चौधरी यांच्या नावे आहे. घाडगे यांचे मित्र प्रल्हाद बलभीम शिंदे (रा.गोंदी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे व दत्तात्रय चौधरी या दोघांवर गुन्हा दाखल केला.

शिंदेंशी वाद
काही दिवसांपूर्वी घाडगे यांचा गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्याशी वाद झाला होता. त्या वेळी घाडगेंना शिंदे यांनी धमकी दिली होती. शिक्षकांच्या बदल्यांच्या कारणावरून घाडगे यांचा खून करण्यात आला असावा, असा गेवराई पोलिसांचा कयास आहे.


घाडगेंच्या हत्येला राजकारणाची पार्श्वभूमी
मूळचे चकलांबा (ता. गेवराई) येथील रहिवासी घाडगे यांचा खून गटशिक्षणाधिकारी शिंदे यानेच मारेकर्‍ यांना सुपारी देत घडवून आणला, असे पोलिस तपासात समोर आले आहे. शिक्षकांच्या बदल्यातील हस्तक्षेप न देखवल्याने हा प्रकार घडला. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर घाडगे यांनी 8 डिसेंबर रोजी गेवराई ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. विशेष म्हणजे हा अर्जही गहाळ झाला असून या प्रकाराची जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी चौकशी सुरू केली आहे.