आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्री लोणीकरांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या परतुरात काँग्रेसचा विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना : चार नगरपालिकांपैकी तीन नगरपालिकांवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले, तर अंबड नगरपालिका ताब्यात घेत भाजपने मुसंडी मारली. गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात दोन पालिका होत्या तर जालना पालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी होती. मात्र दोन्ही पालिकांतील सत्ता कायम ठेवण्यात अपयश आल्याने राष्ट्रवादीचा सफाया झाला. परतूर नगरपालिकेत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदा लोणीकर यांचा पराभव झाला. येथे काँग्रेसच्या विमल जेथलिया विजयी झाल्या.
नोव्हेंबर-डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या चार पालिकांच्या निवडणुकीत भोकरदन आणि अंबड या पालिकांत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली होती, तर परतूर पालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली होती. जालना पालिकेत काँग्रेससोबत राष्ट्रवादी सत्तेत होती. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला आपले वर्चस्व राखण्यात अपयश आले. दुसरीकडे काँग्रेसने परतूर,भोकरदन आणि जालना पालिकेची सत्ता ताब्यात घेतली आहे. अंबड पालिकेत भाजपने काँग्रेसचा पराभव करीत मुसंडी मारली. नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवरच या निवडणुका लढवल्या गेल्या.

पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक
भोकरदनमध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या पत्नी मंजूषा, परतूर येथे काँग्रेसचे माजी आ. सुरेश जेथलिया यांच्या पत्नी विमल, पालकमंत्री लोणीकर यांच्या पत्नी मंदा लोणीकर, अंबड पालिकेत भाजपचे आ. नारायण कुचे यांच्या भावजय संगीता कुचे, तर जालना पालिकेत काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या.
बातम्या आणखी आहेत...