आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री दिवाकर रावतेंकडून अधिकारीची झाडाझडती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - येथील नियोजन भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री दिवाकर रावते यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. या अभियानात होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले.

बैठकीला सुरुवात झाल्यानंतर जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा सविस्तर अहवाल सादर केला. त्यात त्यांनी भोकर तालुक्यात २२ पैकी २१ गावांत अभियानांतर्गत कामे सुरू झाल्याचे सांगितले.

भोकर हा अमिता चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. या तालुक्यात कामे त्वरेने सुरू झाली, मग इतर तालुक्यांत का नाही, यावरून रावते यांनी झाडाझडती सुरू केली.

जिल्हाधिकारी स्वत:च सर्व जिल्ह्याचा अहवाल सादर करीत होते. त्या वेळी "आपल्या कार्यालयात एवढे उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांना कामे वाटून द्या. तुम्ही एकटेच सर्व का करता?' असा प्रश्न त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच केला. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या झाडाझडतीमुळे अनेक अधिकारी भांबावून गेले.