आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीमध्ये एक लाख पाचशेचा गुटखा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - शहरातून गंगाखेडकडे कारमधून नेण्यात येणारा एक लाख सहा हजार ५०० रुपयांचा गुटखा बुधवारी पोलिस व अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील इटके कॉर्नर भागात जप्त केला असून सायंकाळी पंचासमक्ष गुटखा जाळण्यात आला. गुटखा गंगाखेड येथे विक्री करण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे व अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांनी कारमधून गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी झुल्फेकार अय्युब तांबोळी, सुनील साठे (दोन्ही रा. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...