आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm News In Marathi, Farming Ponds, Divya Marathi

आसवांचा पाऊस: शेततळ्यांमुळे उमेद कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडवंची - कडवंचीच्या गारपीटग्रस्त भागात फिरताना झालेल्या नुकसानीने खंतावलेले, निराश झालेले शेतकरी भेटले खरे, पण त्यांच्यात पुन्हा उभे राहण्याची उमेदही पाहायला मिळाली. गारपिटीच्या एका तडाख्यामुळे आर्थिक गणित दोन वर्षे मागे नेले असतानाही ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असेच ते म्हणत आहेत. गारपीटग्रस्त मराठवाड्यात निराशेने खचून जाऊन आत्महत्या करणा-या शेतक-यांची संख्या दिवसागणिक वाढत असताना कडवंचीचा शेतकरी त्यामुळेच वेगळा आणि उठून दिसतो. या उमेदीमागे आहे पाणी!


कडवंची गावाकडे जाताना जागोजागी शेततळी पाहायला मिळाली. गावात गेलो तर तिथे कळाले गावात दहा-बारा नाही तर तब्बल 325 शेततळी आहेत. या शेततळ्यांनीच शेतक-यांतील उमेद जिवंत ठेवली आहे. मागील वर्षी आतापर्यंतचा सर्वात भीषण दुष्काळ मराठवाड्याने पाहिला. त्यातला जालना जिल्हा तर तहानलेल्यांचे मॉडेल ठरावे एवढा होरपळून निघाला. अवघा जालना जिल्हा बाहेरून येणा-या पाण्यावर तहान भागवत असताना कडवंची मात्र बरीच निर्धास्त होती. कारण गावात जलसंधारणाची कामे खूप झाली. पाणी अडवण्याचे प्रयोग यशस्वी झाले. शेतीसाठी शेततळी तयार केली गेली. या शेततळ्यांनीच गावाला तारले. चंद्रकांत क्षीरसागर म्हणाले त्याप्रमाणे गेल्या दुष्काळात कडवंचीचे एकही जनावर छावणीत गेले नाही. द्राक्ष उत्पादकांनी 7 ते 8 कोटींचे उत्पन्न काढले. 198 मिमी पावसानंतरच्या कडवंचीतील ही स्थिती आहे. क्षीरसागरांच्या शेतात दोन शेततळी आहेत. अडीच कोटी लिटर पाणी साठवणारे 50 फूट खोलीचे अवाढव्य नवे शेततळे आहे. उत्तमराव क्षीरसागर म्हणाले की, पाण्याची आम्हाला फिकीर नाही. फक्त वाईट याचे वाटते की, गारपिटीने आमचे गणित चुकवले. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ सांगत शेतक-याने निराश होऊन चालत नाही, असा सल्ला त्यांनी दिला.


शेततळ्यांनी तारले...
कडवंची गावात शेतीसाठी शेततळी तयार केली गेली. या शेततळ्यांनीच गावाला तारले. रमेश क्षीरसागर यांनी सांगितले, त्याप्रमाणे गेल्या दुष्काळात कडवंचीचे एकही जनावर छावणीत गेले नाही. द्राक्ष उत्पादकांनी 7 ते 8 कोटींचे उत्पन्न काढले. 198 मिमी पावसानंतरच्या कडवंचीतील ही स्थिती आहे. या पुढेही या शेततळ्यांवरच गावची भिस्त आहे.