आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Harassment News In Marathi, Women Harassment Issue At Aurangabad , Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘त्या’ तक्रारीची महिला आयोगाकडे सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी कार्यालयातील महिला अधिकार्‍यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार राज्य महिला आयोगाच्या सदस्या शोमिता बिश्वास यांच्याकडे उपसंचालक कार्यालयातील दोन महिला अधिकारी व अन्य एक महिला कर्मचार्‍याच्या नावाने करण्यात आली होती. यासंदर्भातील वृत्त दै. ‘दिव्य मराठी’च्या सहा फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित झाले होते. दरम्यान, या पत्र प्रपंचावरून उपसंचालक प्रदीप पाटील यांना झालेल्या मनस्तापाचा भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे निषेध केला आहे.
या तक्रारीवर आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात नुकतीच सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत या महिला अधिकार्‍यांनी आपण ही तक्रार केलीच नसल्याचे सांगितले. आमच्या नावाने अशा गंभीर स्वरूपाची तक्रार करून आम्हाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या महिलांनी म्हटले आहे. याबरोबरच अशा प्रकारच्या तक्रारीने आमच्या कौटुंबिक स्वास्थ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, आमचे मानसिक खच्चीकरण करणे व समाजात बदनाम करण्याच्या उद्देशाने तक्रार करण्यात आली आहे. तक्रार करणार्‍याने आमच्या नावाचा गैरवापर करून आमच्या खोट्या स्वाक्षर्‍याही केल्या आहेत, असेही या महिला अधिकार्‍यांनी सुनावणीत सांगितले असल्याचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.